जळगाव (प्रतिनिधी) घराचा व्यवहार झाल्याने त्याची मिळालेली रक्कम ही बांधकाम व्यावसायीकाला देण्यासाठी आणली होती. ती २ लाख ६५ हजारांची रोकड आणि १५ हजारांचे दागिने असा एकूण पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरांनी चोरुन नेला. ही घटना १ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सत्यम पार्क परिसरात घडली. या प्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सत्यम पार्क परिसरातील सोपान नगरात राजू जगन्नाथ साळवे (वय ५८) हे शेतकरी वास्तव्यास आहे. साळवे यांना घर घ्यायचे होते, त्यांना घर आवडल्यामुळे त्यांनी घराचा व्यवहार देखील केला होता. त्याकरीता बिल्डरला देण्यासाठी त्यांनी २ लाख ६५ हजार रुपये घरात ठेवले होते. या घराला कुलूप लावून साळवे कुटुंबीय रात्री झोपलाल होते दावेव्य मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ज्या घरात रक्कम ठेवलेली होती. त्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरात असलेले रोख दोन लाख ६५ हजार रुपयांसह १५ हजार रुपयांचे सोन्याचे कानातील टॉप, साकळ्या असा ऐवज चोरुन नेला.
झोपेतून उठल्यानंतर घटना उघडकीस मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे रोकडसह सोन्याचे दागिने चोरुन घेवून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास साळवे कुटुंबिय झोपेतून उठले असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी लागलीच तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















