नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने कँब्रिज अॅनालिटिकाविरूद्ध फेसबुकवरून डेटा चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर ५ लाख ६२ हजार भारतीय फेसबुक वापरकर्त्यांकडून डेटा चोरी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ब्युरोने UK कंपनी ग्लोबल सायन्स रिसर्च लिमिटेड (GSRL) याच्या विरोधातही कारवाई सुरू केली आहे.
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआयने (CBI) युकेस्थित कंपनी केंब्रिज अॅनालिटिकाविरुद्ध ५.६२ लाख भारतीय फेसबुक वापरकर्त्यांचा खासगी डेटा चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने याच प्रकरणात आणखी एक कंपनी ग्लोबल सायन्स रिसर्चचंही नाव FIR मध्ये दाखल आहे. CBI च्या म्हणण्यानुसार, सोशल मीडिया कंपनी फेसबुकने म्हटले होते की GSRL ने चुकीच्या पद्धतीने भारतातील सुमारे ५.६२ लाख वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा गोळा केला. नंतर हा डेटा कँब्रिज अॅनालिटिकासह शेअर केला. या डेटाचा वापर भारतातील निवडणुकांवर परिणाम करण्यासाठी केला गेला आहे, असा आरोपही कंपनीवर करण्यात आला आहे. फेसबुक-कँब्रिज अॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणाची चौकशी सीबीआय करेल, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली होती. ग्लोबल सायन्स रिसर्चने बेकायदा पद्धतीने ५.६२ लाख भारतीय फेसबुक युझर्सचा डेटा गोळा केला आणि कॅब्रिज अॅनालिटिकाला दिला, असे उत्तर सोशल मीडिया कंपनीने सीबीआयला दिले होते. या डेटाचा वापर भारतातील निवडणुकीवर परिणाम होण्यासाठी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मार्च २०१८ च्या दरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी कँब्रिज अॅनालिटिकाचे माजी कर्मचारी, सहकारी आणि कागदपत्रांच्या आधारे पाच कोटीपेक्षा जास्त युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीशिवाय फेसबुक प्रोफाइलवरून चोरल्याच्या बातम्या दिल्या होत्या. सुरुवातीला यामध्ये कँब्रिज अॅनालिटिकाने भारतीयांचा डेटा नसल्याचे सांगितले होते. मात्र, यानंतर ५.६२ लाख भारतीयांचा फेसबुक डेटा घेतल्याची कबुली कंपनीकडून देण्यात आली. या प्रकरणी आता सीबीआयकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.