पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी आधी जाहीर केल्यानुसार आपला वाढदिवस हा अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी एक लाखांचा कृतज्ञता निधी कोविडग्रस्तांच्या मदतीसाठी सुपुर्द केला. तर त्यांनी कोणत्याही सार्वजनीक कार्यक्रमाला हजेरी न लावता रूग्णसेवेतून आपला वाढदिवस हा अनोख्या पध्दतीने साजरा केला.
याबाबत वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा पाळधी गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आपण यंदा वाढदिवस साजरा करणार नसून फक्त स्मार्टफोनवरून शुभेच्छा स्वीकारणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच आपल्या चाहत्यांनी कोणत्याही सार्वजनीक कार्यक्रमांचे आयोजन न करता कोविडग्रस्तांची सेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. याअनुषंगाने प्रतापराव पाटील यांचे सकाळी त्यांच्या निवासस्थानी औक्षण करण्यात आले. वडिलधार्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी थेट पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटर गाठले. येथे रूग्णांना त्यांनी फळ वाटप केले.
दरम्यान, प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या चाहत्यांनी एक लाख रूपयांचा निधी हा कोविडग्रस्तांसाठी प्रदान केला. यात बंडूदादा नारखेडे, मुकेश सोनवणे, चंदूभाऊ इंगळे, माजी सरपंच चंदू माळी पाळधी येधील एपीआय गणेश बुवा,सा.बा.चे उप अभियंता श्रेणी १ सुभाष राऊत, पंकज बिर्ला, जितूशेठ, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पवार, उदय झंवर मित्र परिवार पाळधी, आव्हाणी येथील सरपंच सदाशिव पाटील यांनी निधी प्रदान केला असून यात कोरोना रूग्णांसाठी विविध वस्तूंची खरेदी करण्यात येणार आहे.
यासोबत कोविड केअर सेंटरसाठी चादरी, औषधी आदींचे संकलनही याप्रसंगी करण्यात आले. तर वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३५ पिशव्या इतक्या रक्ताचे संकलन करण्यात आले. याच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, अरूण पाटील, शरद कोळी, मच्छींद्र कोळी, भूषण पाटील .बळीराम कोळी, अनिल माळी, योगेश सोनवणे.बाळासाहेब पाटील, पियुष पाटील, प्रतीक पाटील, सुभाष ननवरे,
ग्रामपंचायत सदस्य पप्पू माळी, दिगंबर माळी, अरविंद मानकरी, अल्पसंख्याक प्रमुख दानिश पठाण, चेतन झंवर, सुधाकर माळी, गजानन ठाकूर,
धनराज कासट, रवी माळी, दादा वाडी येथील राहुल पाटील, सा. बा.चे उप अभियंता सुभाष राऊत, आदींसह प्रतापराव पाटील मित्र परिवाराने सहकार्य केले.