अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील मारवाड रस्त्यावरील राम मंदिरात या वर्षी रामनवमी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
मंदिर भाविकांसाठी बंद होती मंदिर ट्रस्टचे मिलिंद अग्रवाल व पल्लवी अग्रवाल यांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्यात आला. यावेळेस भाविकांना परवानगी नव्हती. यावेळी मंदिरातील सेवक महेंद्र परदेशी सत्यवान महाजन, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चौधरी, गोपाल अग्रवाल, एमडी चौधरी व मंदिराचे पुजारी सारंग कुलकर्णी उपस्थित होते.