धरणगाव (प्रतिनिधी) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस धरणगावात आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गरजवंत विद्यार्थ्यांना याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
अजित पवार यांचा वाढदिवस विधायक कार्यक्रमाने साजरा करून राष्ट्रवादीने आदर्श घालून दिला. येथील पी.आर.हायस्कुल मध्ये शिकणाऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांना १३ डझन वह्या, पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवकचे तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, सीताराम मराठे, सतखेड्याचे सरपंच शरद पाटील, साकऱ्याचे सरपंच घनःश्याम पाटील, देवरे आबा, सागर बाजपेयी, सागर भामरे, मनीष चौधरी, नारायण चौधरी यांसह शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर संजीवकुमार सोनवणे, के.आर.वाघ उपस्थित होते.