नशिराबाद (प्रतिनिधी) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील व मुख्याध्यापक प्रविण महाजन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर विद्यालयाचे विद्यार्थी श्रध्दा सराफ व प्रसाद सराफ तसेच उपशिक्षिका वंदना पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे नियोजन वैशाली भोळे व सुनिता शिवरामे यांनी केले.