चोपडा (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारात एसटीचा ७६ वर्धापन दिन विविध कार्यक्रम राबवुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख महेंद्र पाटील होते. तर कार्यक्रमासाठी चोपडा शहराचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सहा पो.नि. पावरा उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत सेवा निवृत्त प्रमुख कारागिरी प्रभाकर महाजन व वर्षा महाजन यांच्या हस्ते सपत्नीक सजवलेली एसटीचे ओटी भरून औक्षण करून आगार प्रमुख महेंद्र पाटील व पो. नि. मधुकर साळवे यांच्या हस्ते केक कापुन वाढदिवस (वर्धापन दिन)साजरा करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते कर्मचारी बांधवाचे गुणवंत पाल्यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच प्रवाशांचे देखील यावेळेस गुलाबपुष्प व पेढे देवुन सत्कार करून चोपडा आगारात आगळावेगळा पध्दतीने एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वरिष्ठ लिपिक डि.डि.चावरे यांनी केले. यावेळी स्थानक प्रमुख नितीन सोनवणे,वाहतुक निरिक्षक सागर सावंत,सहा कार्यशाळा अधिक्षक सिध्दार्थ चंदनकर,वाहतुक नियंत्रक संजय सोनवणे, योगराज पाटील, चंद्रभान रायसिंग, नरेंद्र जोशी, भगवान नायदे,अतुल पाटील, दिपक पाटील,पी डी पाटील,शाम धामोळे,रमेश अहिरे,जिजाबराव देवराज, मुरलीधर बाविस्कर,कलिम शेख, प्रसन्न पाटील जयश्री परदेशी,रिना पाटील,निता कंखरे,ममता बाविस्कर,वृषाली बैसाणे,शहादत तडवी सह कर्मचारी व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सजवलेली गाडी स्वतः डेपो मॅनेजर महेंद्र पाटील यांनी डेपोतून आणून क्यूमध्ये लावली. निवृत्त प्रमुख कारागिरी प्रभाकर महाजन व वर्षा महाजन यांच्या हस्ते सपत्नीक सजवलेली एसटीचे ओटी भरून औक्षण केले मात्र सात सुसवानिकांनी ओटी भरली. बस स्थानकात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून संपूर्ण परिसर सजविण्यात आले होते तसेच एस.टी.च्या लोगोची रांगोळी सौ.नीता कंखरे यांनी काढलेली रंगोळीकडे लक्ष वेधले जात होते.