अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूलमध्ये आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी (१५ जून) विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडत होता. यावेळी मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक एस.बी.निकम,जेष्ठ शिक्षक डी.एम.दाभाडे,सी.एस.सोनजे,एस.आर. शिंगाणे, के.पी.पाटील,जेष्ठ लिपिक शाम पवार तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.