कोरपावली ता. यावल (प्रतिनिधी) येथे ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कोरपावली कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी गावाचे तरुण तडफदार युवा प्रथम नागरिक सरपंच विलास नारायण अडकमोल, सदर कार्यक्रमाला उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, ग्राप कोरपावलीचे सर्व सदस्य व सदस्या, कर्मचारी, गावातील विविध संस्थांचे अध्यक्ष, सचिव,चेअरमन, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्येकर्ते गावातील जेष्ठ नागरिक, महिला, युवक, बालमित्र आदी उपस्थित होते.