साकळी ता. यावल (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले चौकात स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण भिका बोरसे व श्रीराम महाजन यांनी केले.
याप्रसंगी माजी जि.प सदस्य वसंतराव महाजन, माळी समाज अध्यक्ष सुभाष महाजन, उपाध्यक्ष दिनकर माळी, शाम महाजन, आर.जे. महाजन, खान्देश माळी महासंघ युवक तालुका अध्यक्ष किरण माळी, भास्कर महाजन, रमेश महाजन, सुभाष महाजन, सुरेश महाजन, रामकृष्ण माळी, मुकेश बोरसे, रविंद्र महाजन, जयंत बोरसे, प्रविण बोरसे, ज्ञानदेव महाजन, दिलीप महाजन, अशोक महाजन, नाना माळी, यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.