अमळनेर (प्रतिनिधी) क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे त्यांचे विचारांचे आचरण हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे असे शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, आय .आर महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी शिक्षकेत्तर कर्मचारी एन.जी. देशमुख, संभाजी पाटील, गुरुदास पाटील उपस्थित होते.