धरणगाव (प्रतिनिधी) येथील एकशे सात वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी.आर.हायस्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या निमित्त झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक कैलास वाघ आणि बापू शिरसाठ यांनी महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाबद्दल सदोहारण माहिती कथन केली. डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महात्मा गांधींच्या सामाजिक आणि राजकीय कामगिरीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गणेश सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक संजय बेलदार यांनी केले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर.के.सपकाळे, पर्यवेक्षिका डॉ. आशा शिरसाठ, एनसीसी आॅफिसर डी.एस.पाटील, ज्येष्ठ शिक्षक उमाकांत बोरसे, व्ही. एच. चौधरी, डॉ.वैशाली गालापुरे, वरिष्ठ लिपिक एस. यू. ओस्तवाल यांच्या सह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी योगेश नाईक यांनी मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे यांनी सहकार्य केले.