TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात कष्टाळू व्हीजनरींचे लेवा बिझनेस एक्स्पो- 2022 !

वाचा ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांचा विशेष लेख !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) विविध उत्पादक कंपन्यानी अथवा उद्योजक किंवा व्यवसायिकांच्या संघटनांनी एकत्र येऊन बिझनेस एक्स्पो भरविण्याचे ऐकिवात किंवा अनुभवात आहे. मात्र एखाद्या समाज समूहाने बिझनेस एक्स्पो भरविण्याचे हे पहिलेच एकमेव उदाहरण म्हणता येईल.
जळगावात आज पासून 2 ऑक्टोबर पर्यंत लेवा पाटीदार बिझनेस एक्स्पो 2022 भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचं वैशिष्ठ्य म्हणजे यात आयोजक समाज आहे, व्यक्ती किंवा सामाजिक संस्था नाही. प्रदर्शन आयोजकां ऐवजी सह कार्याभिलाशी म्हणून लेवा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर आणि लेवा पाटीदार ग्लोबल सोशल फौंडेशन या दोन संघटनांची नावे आहेत. समाज आणि समाज समूहाला महत्व दिले आहे, यातून आयोजकांचा उदात्त व सामाजिक बांधिलकीचा हेतू स्पष्ट होतो.
लेवा पाटीदार समाजातील काही सामाजिक प्रगतिशील विचाराच्या तरुणांनी एकत्र येऊन उद्योजकता आणि व्यवसायिकतेच महत्व सामाजिक विकासाच्या दृष्टीने जगा समोर आणण्याच्या उद्देशाने हे लेवा एक्स्पो प्रदर्शन भरविले आहे. हा विचार आणि ही दृष्टी येण्या मागे निश्चितच पूर्वजांच्या स्वकष्टार्जित व्हिजन कारणीभूत आहे, त्यामुळे या समाजाचं औद्योगिक आणि दृष्टिकोनाचा मागोवा घेणे क्रमप्राप्त आहे. साधारणपणे चाळीस च्या दशकात तंत्रज्ञान विषयाचे पहिले डिप्लोमा धारक मोतीराम गंगाराम बेंडाळे आणि त्यांचे बंधू रुपाजी बेंडाळे यांनी क्रूड ऑईल च्या सहाय्याने वीज निर्मितीचा पहिला प्रयोग सावदा (ता.रावेर) येथे यशस्वी करून दाखविला.वीज निर्मितीसाठी लागणारे रस्टिन नावाचे यंत्र अथवा इंजिन जर्मनी हुन आयात केले होते, कल्पना करा पारतंत्र्याच्या काळात स्वतः च्या हिमतीवर यंत्र सामुग्री परदेशातून मागविणे किती जिकीरीचे होत, पण व्हिजनरी वृत्तीने ते करून दाखविले.
दुसरे व्हीजनरी रावसाहेब रुपचंद पाटील (सावदा) यांची मोरव्ही गुजरातमध्ये सूत गिरणी होती, तर भाऊसाहेव टी. जी .चौधरी त्या काळात टेक्सटाईल उद्योगाचे एक्सपर्ट म्हणून ख्याती प्राप्त गृहस्थ होते, त्यांनी त्या काळात अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या, ही जी काही उदाहरणे मी या लेखात मांडली आहेत, त्यातील काहींच्या नोंदी ब्रिटीश कालीन सरकारी गॅजेटीएर मध्ये नमूद आहेत. उद्योग आणि व्यवसायिकतेचा पाया निश्चितच कृषि आहे, तापी आणि सातपुड्या च्या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी जी कृषी क्रांती केली, त्याची देशाच्या कोणत्याही इलक्याशी होऊ शकत नाही. केळी पिकांचं आगर म्हणून जे आपण ज्या अभिमानाने उल्लेख करीत असतो, त्या मागे अपार कष्ट, जिद्द, चिकाटीचा इतिहास आहे, सिंचनाची पुरेशी सोय नसतांना शंभर, दोनशे फूट खोल विहिरी खणून पन्नास, साठ च्या दशकात केळी फुलवली, ही अविश्रांत परिश्रमाची प्राणितीच. बारमाही वाहणाऱ्या नद्यांचे प्रदेश असलेले उत्तरप्रदेश, हरियाणा,बिहार किंवा शेजारच्या मध्यप्रदेशानेही अशी क्रांती त्या कालखंडात करून दासखविली नाही, म्हणून समाजाची सामूहिक दूरदृष्टी अन व्हिजन कौतुकास्पद म्हणता येईल.

अभिनव उद्योग अन सेवांचे प्रदर्शन

READ ALSO

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

लेवा पाटीदार बिझनेस एक्स्पो नव उद्योजकांना प्रगतीची संधी मिळावी,त्यांच्या औद्योगिक कल्पकतेची समाजाला माहिती व्हावी, त्याच बरोबर नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या अभिनव व उदात्त हेतूने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. केवळ तेवढंच नव्हें तर समाजाने प्रगतीचा कुठ पर्यंतचा टप्पा गाठला आहे आणि पुढे किती अन काय साध्य करायचे आहे. याचं ही दिशा दर्शन ही या एक्सपोच टार्गेट दिसून येत आहे. या शिवाय सामाजातील नाविन्यपूर्ण स्किल, आपापसात संवाद, विचाराची देवाण घेवाण हा याचा मुख्य उद्देश्य या निमित्ताने स्पष्ट होत आहे. एकमेकांची उत्पादने,व्यवसायिक सेवा घेऊन स्थानिक नवं उद्योजकांनी प्रगती साधावी तसेच ग्राहकांना आनंददायी वाटावं, अश्या वातावरणाची निर्मिती चंदन कोल्हे, चंदन अत्तरदे, भूषण बढ़े, बिपीन पाटील, डॉ पवन भोळे, नितीन इंगळे, महेश चौधरी या व त्यांच्यासह परिश्रम घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी केलेली आहे. या प्रदर्शनात एकूण 152 स्टॉलस् असून या पूर्वीच्या प्रदर्शना पेक्षा हे वेगळे आणि भव्य आहे. आटोमोबाईल,इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, होमडेकोर, कृषी ,पेंट्स, विविध हस्तकला, ग्राहकोपयोगी अभिनव सेवा आदी या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. लेवा समाजातील नवं विचाराच्या तरुणांनी केलेले हे धाडस अन् प्रयोग कौतुकास्पद ठरावं, या अपेक्षेसह शुभेच्छा !

सबेरा तब नही होता जब सूरज उगता है
सबेरा तब होता है, जब आंखे खुलती है…!

सुरेश उज्जैनवाल, पत्रकार (8888889014)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
Next Post

बिग बॉसमध्ये बोलावले तर, ही सोन्यासारखी संधी : गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गाव तिथे शिवसेनेच्या शाखेला प्राधान्य : प्रतापराव पाटील !

September 23, 2023

सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणी पोहोचली आयकर विभागाची टीम ; जाणून घ्या…जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण ?

September 15, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १८ जानेवारी २०२३ !

January 18, 2023

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

November 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group