TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय बाजारात दरोडेखोरीला ‘एमआरपी एक्ट’ पूरक ; ‘माॅर्डन ट्रेण्ड’ पद्धतीत वस्तुंंचा गृप करून ग्राहकांची फसवणूक !

किंमतीवर नियंत्रणासाठी 'एमआरपी' वर 'जीएसटी' आकारावा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2022
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (दिलीप तिवारी) ऑनलाइन शाॅपिंग टाळून स्थानिक बाजारात खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य द्यावे असा आग्रह सोशल मीडियातून केला जात असताना स्थानिक बाजारातील विक्रेते (काही) नीट वर्तवणूक करीत नाहीत अशीही तक्रार समोर आली. या उलट-सुलट विषयात अत्यंत कळीचा मुद्दा हाती आला. तो म्हणजे, उत्पादक एकच असला तरी दुकानात, माॅलमध्ये आणि ऑनलाइन विक्रीत वस्तुंच्या किंमतीत तफावत का येते ?

भारतात वस्तुंच्या विक्रीशी संबंधित ‘एमआरपी एक्ट’ आहे. एमआरपी म्हणजे वस्तूची ठरवलेली सर्वाधिक किंमत (अधिकतम मूल्य) होय. हा कायदा वस्तुंच्या किंमतीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. वस्तू बाजारात नेेण्यापूर्वी त्यावर एमआरपी नोंदलेली हवी. एमआरपी पेक्षा जास्त किंमतीत वस्तू विक्री करू नये हे उत्पादक आणि विक्रेत्यांवर कायद्याचे बंधन आहे. पण एमआरपीच्या आडून उत्पादक व ठराविक विक्रेते दरोडेखोरी करतात. ती खालील प्रमाणे.

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

कायदा म्हणतो एमआरपी लिहा. पण उत्पादन मूल्याच्या (निर्मीती खर्चाच्या) तुलनेत किती टक्के नफा घेऊन किती एमआरपी लिहावी यावर निर्बंध नाहीत. म्हणून एकूण १० रुपये निर्मिती खर्च असलेल्या वस्तूची एमआरपी १०० रूपये (१० पट ) उत्पादक ठेऊ शकतो. एमआरपी १०० पट ठेवली तरी त्यावर बंधन नाही. एकच उत्पादक, एकाच एमआरपीची वस्तू स्थानिक दुकानदाराला ७० रूपयात (ग्राहकासाठी विक्री किंमत ९० रूपये), माॅल वा सुपर शाॅपला ६० रूपयात (ग्राहकासाठी विक्री किंमत ५० रूपये), ऑनलाइनला ४० रूपयात विक्री करतो. ऑनलाानवर ग्राहकासाठी विक्री किंमत ५५ रूपये असते. दुकानदार विक्रीसाठी १०० वस्तू घेतो. माॅल वा सुपर शाॅपवाला विक्रीसाठी १० हजार वस्तू घेतो. ऑनलाइनवाला विक्रीसाठी १ लाख वस्तू घेतो. उत्पादकाच्या वस्तू विक्रीसाठी जो जास्त घेईल त्याच्यासाठी एमआरपी तेवढी कमी. अशा प्रकारे एमआरपी पेक्षा कमी किंमतवर नफा मिळवायचा हेतू साध्य करण्यासाठी दुकानदाराला केवळ ३० रूपये, माॅल व सुपरशाॅपमध्ये ४० रूपये आणि ऑनलाइनवर ६० रूपये दर कमी केले जाऊ शकतात. हीच तर ग्राहकाची एमआरपी आडून लूट आहे.

यात आणखी एक व्यावसायिक फंडा आहे. माॅल व सुपर शाॅपवाले उत्पादकांकडे वस्तूंचे पॅकेज करून मागतात. म्हणजे तेलावर शाम्पू वा साबण फुकट. साखरेवर टूथपेस्ट फुकट. वाॅशिंग पावडरवर चहा पावडर फुकट. यालाच ‘माॅर्डन ट्रेण्ड’ म्हणतात. अशा वस्तुंच्या गृपची एकत्रित एमआरपी खूपच कमी केलेली असते. विशिष्ट संख्येत वस्तू विक्रीची हमी घेतलेली असते. असाच फंडा ऑनलाइनवाले वापरतात व कमी किमतीचा खास हंगामी सेल लावतात. ‘माॅर्डन ट्रेण्ड’ च्या नावावर १०० पट एमआरपी वाढवून त्यात २५ टक्के सूट दाखवून ग्राहकांची थेट लूटच असते. काही माॅलमध्ये दुसर्‍यांची उत्पादने विशिष्ट ब्रॅण्डच्या नावाने कमी किमतीत विक्री केली जातात. अशा व्यवहारात ब्रॅण्डची विक्री होते व माॅलचे नाव होते.

आत अजून एक गंमत आहे. उत्पादक वा ठोक विक्रेता वस्तुंच्या विक्री बिलांवर जीएसटी भरतो. बिलांची आकारणी दुकानदारांंसाठी वेगळी, माॅल-सुपर शाॅपसाठी वेगळी आणि ऑनलाइनसाठी वेगळी असते. तेथे सेेल टैक्सवाले उत्पादकाला वा ठोक विक्रेत्याला हा प्रश्न विचारत नाही, तुझ्या एकाच वस्तूच्या विक्रीचीकिंमत एकाला जास्त आणि दुसर्‍याला कमी का ? केंद्र व राज्य सरकारला वस्तूंच्या किंमती नियंत्रणात ठेवत व सर्वत्र एकाच पातळीवर आणायच्या असतील तर एकूण उत्पादित वस्तुंच्या छापील एमआरपीवर जीएसटी आकारला जावा. म्हणजेच सर्वत्र वस्तू एकाच किंमतीत विक्री होतील.

 

ता. क. – वरील माहिती व्यापारी सूत्रांकडून मिळाली आहे. माहितीचा अनुसरून दुकानदार, माॅलचालक वा ऑनलाइन साखळीचे मालक त्यांची बाजू मांडून शकतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

पिंपळे शिवारातून ७० हजारांचा कापूस चोरीला ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडचं शिक्कामोर्तब

January 19, 2021

गफ्फार मलिकांच्या अंत्ययात्रेबाबत दाखल केलेला गुन्हा मागे घ्या ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

May 31, 2021

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026

योग्य ती सर्व खबरदारी घेऊन दिवाळी नंतर शाळा सुरू कराव्यात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

November 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group