धरणगांव ( प्रतिनिधी) एकशे सहा वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलला धरणगाव येथील श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने तात्यासाहेब क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मूर्ती तर माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य तैलचित्र भेट देण्याचा कार्यक्रम करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते. तर मंचावर शिक्षक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रा.रवींद्र माळी, धरणगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दीपक भाऊ वाघमारे, माजी नगरसेवक निलेश चौधरी, डाॅ.देवकीनंदन वाघ यांची उपस्थिती होती. यावेळी या मूर्त्या शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांना देण्यात आल्या. प्रारंभी सावता माळी युवक संघाच्या शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष कैलास वाघ यांनी प्रास्ताविक केले. तर बहुजन क्रांती मोर्चाचे पी. डी. पाटील, वैद्यकीय आघाडीचे डॉ. देवकीनंदन वाघ, प्रा. रवींद्र माळी यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र महाजन, तालुकाध्यक्ष निलेश माळी, मल्लविद्या आघाडीचे अध्यक्ष किशोर पैलवान, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष आकाश महाजन, व्यापारी आघाडी अध्यक्ष गुलाब महाजन, जयेश महाजन, योगेश महाजन, घनश्याम पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक महाजन यांनी केले तर आभार आकाश महाजन यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व श्री संत सावता माळी युवक संघाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.