धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील संजयनगर येथे भाऊसो. हेमंत महाजन मित्र परिवार आयोजित धरणगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे हळदीकुंकू सोहळा घेण्यात आला. याप्रसंगी संजय नगर परिसरातील तमाम माता भगिनींनि उपस्थित राहत या मंगलमय सोहळ्यात आपला सहभाग नोंदवला.
तत्पूर्वी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा उषाताई वाघ व प्रमुख अतिथी म्हणून उपनागराध्यक्षा कल्पनाताई महाजन, उपनागराध्यक्षा सुरेखाताई महाजन, अंजलीताई विसावे, किर्तीताई मराठे, रत्नाताई धनगर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी तथा नगराध्यक्षा उषाताई गुलाबराव वाघ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांनी चूल व मुलं सांभाळत आज राष्ट्रपती भवन सुद्धा सांभाळून दाखवले आहे. २१ व्या शतकात पुरुषप्रधान संस्कृतीला आडफाटा देत महिलांना अश्या सामाजिक व एकत्रित येणाऱ्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहावे. जेणे करून येणाऱ्या पुढील पिढीला आपण योग्य न्याय व दिशा देत खऱ्या अर्थाने लोकशाही सदृढ करण्यास मदत करू. अशा मंगलमय हळदीकुंकू सोहळ्यास आलेल्या बघिणींना भेटवस्तू सुरूपात वस्तू वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी महिलांच्या आनंदाला उधाण आले होते.
याप्रसंगी संगीताबाई महाजन, सीमा महाजन, अशाबाई पाटील, सुनीता मोरावकर, गीता धोबी, हर्षदा चौधरी, मीनाबाई पाटील, लताबाई महाजन, पमाबाई महाजन, कमलबाई सपकाळे, अंजनाबाई अहिरे, कल्पनाबाई लोहार, लताबाई मोरावकर, दुर्गाबाई मोरावकर, रोशनी महाजन, वैशाली महाजन, संगीता सोनवणे, कविता महाजन आदी महिला भगिनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत महाजन मित्र परिवार संजय नगर यांचे अनमोल सहकार्य लाभून कार्यक्रम संपन्न झाला.