बोदवड (प्रतिनिधी) शहरातील रूणवाल मंगल कार्यालय 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत जळगाव लायन्स क्लब आणि बोदवड भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने गर्भाशयमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक लस शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील 750 मुलींना लस देण्यात आल्या.
यावेळी शहरातील 750 मुलींना लस देण्यात आल्या. ज्या लसची बाजार किंमत ४ हजार ते ५ हजार असून बोदवड तालुक्यातील 10 वर्ष ते 20 वर्ष वयोगटातील 750 मुलींना मोफत देण्यात आली. यावेळी जळगावचे डॉ.निलेश चांडक, डॉ.श्रद्धा चांडक, निलेश संघवी,किशोर बेहरानी,सुगन मुनोत. यांनी मुलींना लस देण्याचे काम केले. तसेच या लस संबंधात मागील आठ ते दहा दिवसा आधी लायन्स क्लब जळगाव व बोदवड जैन संघटनेने शहरातील व तालुक्यातील शाळांना भेटी देऊन गर्भाशयमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक लस बाबत मुलींना माहिती दिली.
तसेच ही लस घेण्यासाठी आपल्या आई-वडिलांनी संमती पत्र घेत, प्रत्येक शाळेत ज्या मुलींना लस घ्यायची आहे. त्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर मुलींसाठी लसीकरण शिबीर राबविण्यात आले.
यावेळी सर्व वैद्यकीय अधिकारी यांची अल्पोपहार, जेवण, चहापानी आदी सर्व व्यवस्था जैन संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. लसीकरण सुरू असताना डॉ. निकीता जैन व डॉ. श्रध्दा चांडक यांनी मुलींना लसीकरण सुरू असताना लस बाबत मुलींसोबत चर्चा करत मार्गदर्शन केले. तसेच या लसीकरणा संबधी माहिती दिली.
यावेळी या लसीकरण शिबिराला भारतीय जैन संघटनेचे माजी महामंत्री प्रकाशचंद सुराणा, दि बोदवड सार्वजनिक शिक्षण सोसायटीचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल व संचालक अजय बर्डिया, जैन श्री संघचे अध्यक्ष अभय बरदडीया, सदस्य अशोक बरडिया ,परेश श्रीश्रीमाल,चंद्रकांत मुथा तसेच नगरसेवक दीपक झांबड हे उपस्थितीत होते. तर भारतीय जैन संघटना बोदवड:विशाल बरडीया,बबलू बरडीया,देवेश बरडीया,अक्षद कोटेचा,अनुज बोथरा,राहुल बरडिया,राहुल बरडीया,अक्षद कोटेचा,अनुज बोथरा,अखील कोठरी बरडिया, विशांक कर्नावट, जय मुथा, शुभम बरडिया, कोटेचा, समकित बरडिया यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.