धरणगाव (लक्ष्मण पाटील) जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेला तरुण संजय भिका पवार आज अमेरिकेत युट्युब कंपनीत कॉपीराईट ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतोय. संजय पवारचा हा थक्क करणारा प्रवास आजच्या नवीन पिढीतील युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
संजयचे वडील कै.भिका नारायण पवार (व्यवसाय:- फर्निचर काम) यांचा २००९ साली मृत्यू झाला. आई:- मीनाक्षी भिका पवार (व्यवसाय:- बालवाडी/ प्राथमिक शिक्षका) आहेत. संजयचे शिक्षण :- BCA/MCM/MCA असे झाले आहे. संजयचे बालवाडी ते बारावी पर्यंत चे शिक्षण शामराव शिवराव पाटील विद्या मंदिर चहार्डी येथे झाले. इयत्ता दहावीत गणित विषयात नापास झालेला संचय गणित विषयात खूप कच्चा होता. तिसऱ्यांदा केलेल्या प्रयत्नातबकसाबसा दहावी पास झाल्यानंतर बारावी किमान कौशल्य मधून झाले. त्यानंतर शिरपूर येथे आर.सी.पटेल ट्रस्ट आय.एम.आर.डी. कॉलेज ला BCA आणि नंतर MCM पूर्ण केलं. BCA करत असतांनाच संजयला एका शॉर्टफिल्म मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. मित्रांच्या सांगण्यावरून संजयला समजले की तो अभिनय क्षेत्रात करियर करू शकतो. त्यानंतर कॉलेज सांभाळून BCA आणि MCM पूर्ण केल्यानंतर पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली या दरम्यान संजयचे आईचे वडील (आबा) कै. भिमराज फकीर सुतार यांची मोलाची साथ आणि अनमोल मार्गदर्शन मिळाले.
संजयचे बाबा कै. भिमराज फकीर सुतार हे रिटायर्ड मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा पाष्टे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे कार्यरत होते. जानेवारी २०२२ मध्ये त्यांचे निधन झाले. डिग्री आणि मास्टर केल्यानंतर पूर्ण वेळ अभिनय करू लागल्यानंतर संचय तारक मेहता का उलटा चष्मा, माझ्या नवऱ्याची बायको, फुलपाखरू, सावधान इंडिया, Crime पेट्रोल, वेबसरीज, बरीचशी गाणे यात अभिनयाची झलक दाखवली. अभिनय करता करता आईची इच्छा होती की मुलाने जॉब देखील करावा म्हणून मग संजयने जॉब शोधायला सुरवात केली. ती वेळ अशी होती अभिनयाचा एक प्रोजेक्ट संपत नाही तोपर्यंत दुसरा प्रोजेक्ट तयार असायचा. पण त्याच्या एक – दोन महिन्यानंतर एक वेळ अशी आली की संजयला अभिनयसाठी एकही प्रोजेक्ट मिळत नव्हता. प्रोजेक्ट नसल्याने त्याला पैसे मिळत नव्हते, मग संजयला त्याच्या आईने सांगितले की तू जॉब करून अभिनय करत रहा. तेव्हा संजयने ठरविले की, अभिनय करता करता जेथे सिरीयल ची शुटींग व्हायची तेथेच ऑनलाइन व्हिडिओ एडिटिंग देखील व्हायची. जेव्हा काही काम नसेल तेव्हा कोणाला न सांगता पाहत राहायचा आणि घरी जाऊन त्याची प्रॅक्टिस करायचा.
गरज पडली तर Youtube व्हिडिओ एडिटिंगचे व्हिडिओ पहायचा त्यामुळे त्याला व्हिडिओ एडिटिंग चांगल्या प्रकारे जमायला लागली होती. संजयने व्हीडिओ एडिटर म्हणून जॉब करायचं निश्चित केलं. जॉब शोधण्यासाठी संजयला त्याचा मित्र – मित्र मोठा भाऊ लक्ष्मण पाटील सर (धरणगाव) आणि टी .बी मॅम (मुंबई) यांनी खूप मदत केली. अनेक प्रयत्नांनी संजयला नेक्स्ट स्टार ग्रुप मध्ये व्हिडिओ एडिटर म्हणून जॉब करायला मिळाला. २ वर्ष अहमदाबाद येथे जॉब करत असतांनाच त्याने M.B.A देखील केले. पुढे त्याच कंपनीद्वारे अमेरिकेत नोकरीसाठी जायची संधी मिळाली, पण त्या वेळेस अमेरिकेत जायच की नाही जायच या विषयावर संजयचा जवळचा मित्र दिनकर शेटे सोबत चर्चा झाली तेव्हा त्याने सांगितले की तू जा परंतु आई मात्र त्याला अमेरिकेत पाठविण्यास तयार नव्हती. अनेक प्रयत्नांनी आईला दिनकर ने समजविले तोपर्यंत संजयची सर्व तयारी झाली होती. पासपोर्ट व्हिजा सर्व रेडी झाल्यानंतर संजय अमेरिकेत गेला आणि जॉब जॉईन केला. अमेरिकेत दिवस छान जात होते, कल्पनेच्या पलीकडे स्वप्नांच्या जगात आल्याचा आनंद संजय अनुभवत होता. एक दिवस संजयने Youtube कंपनीच्या करिअर साईट वर जॉबची पोस्ट बघितली आणि त्यासाठी अप्लिकेशन देखील केले. तीन दिवसात youtube कडुन मेल आला इंटरव्ह्यू साठी.
संजयने इंटरव्ह्यू दिला, खूप टफ इंटरव्ह्यू झाला प्रॅक्टिकली देखील त्यांनी संजयच्या ज्ञानाचा पडताळा घेतला आणि दोन दिवसात तुम्हाला कळविले जाईल असे सांगितले. दोन दिवस मनात खूप धाकधुक होती, विचारांची कालवाकालव सुरू होती, अखेर तिसऱ्या दिवशी Youtube कडुन मेल आला आणि संजयचे सिलेक्शन Youtube company मध्ये अमेरिकेत कॉपीराइट ऑपरेशन मॅनेजर म्हणून झाले. पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलण्यात आले होते, सर्व अतिशय व्यवस्थित झाले. या सर्व प्रक्रियेत संजयला सर्व मित्र-परिवार दिनकर शेटे, प्रीती कावडकर, विकी दातार,वर्षा सबनीस, प्रियंका माळी, रवी शेंडे यांनी मोलाची साथ दिली. आज संजय जे काही आहे त्याचे सर्व श्रेय तो त्याच्या आईला तसेच बालवाडी ते मास्टर शिक्षण होई पर्यंत ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केले त्या सर्व गुरुजनांना देतो. संजयची अशीच भरभराट होत राहो आणि त्यांनी यशाची शिखरे सर करत राहावी हिच सदिच्छा.
– लक्ष्मण पाटील सर
कार्याध्यक्ष – विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव ता. धरणगाव जि. जळगाव