चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील मॉडर्न डेअरीच्या मागील बाजूस जुगाराच्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १६ हजार २०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी रात्री सव्वाअकरा वाजता करण्यात आली.
गुप्त माहिती मिळाल्यावरून, चाळीसगावचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार नितेश पाटील, पो. ना. भूषण मांगो पाटील, पो. ना. विनोद आहे. विठ्ठल भोई, हवालदार शरद पाटील, नंदकिशोर महाजन, समाधान पाटील, आशुतोष सोनवणे या पथकाने छापा टाकला. जुगार खेळणारे इम्तियाज हुसेन मिर्झा (४२, रेल्वे स्टेशन मशीदजवळ चाळीसगाव), बबलू महेबूब शेख (३०, नगरपालिका मंगल कार्यालयाजवळ, हुडको, चाळीसगाव), अफरोज अल्ताफ शेख गुलाम मोहम्मद (३२, पीर मुसा कादरीनगर, चाळीसगाव), गणेश सोनवणे (२४, भडगावरोड, अभिनव शाळेसमोर, चाळीसगाव), सागर वसंतराव गरजे (३२, शनी मंदिराजवळ, रिंगरोड, चाळीसगाव), कामरान बेग हुसेन बेग मिर्झा (३९, पवारवाडी, चाळीसगाव), विशाल दिलीप परदेशी (२६, पवारवाडी, चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले आहे. नासीर उर्फ अप्पी हुसेन मिर्झा पवारवाडी, चाळीसगाव) हा जुगार चालविणारा असल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास चाळीसगाव पोलिस करत आहेत. दरम्यान, यापूर्वीही २२ एप्रिल रोजी खडकी येथे पत्ता जुगारावर कारवाई करुन ११ जणांविरुद्ध कारवाई करुन ७५ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यामुळे सट्टा जुगार व्यवसाय मोठ्या स्वरुपात फोफावला असून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.