चाळीसगाव (प्रतिनिधी) शहराबाह जाणाऱ्या बायपास रस्त्यावर वन विभागाच्या नर्सरीजवळ धुळ्याकडून एका ट्रकने मोटार सायकला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश राकेश चव्हाण (वय २३) आणि निलेश नानसिंग चव्हाण (वय २३ दोघं रा. वासलेपानी जि. बडवानी) हे आपली मोटार सायकल क्रमांक (एमएच-३९ एजी.५०११) वरून लातूर येथून आपल्या गावी वासलेपाणी येथे जात होते. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहराबाह जाणाऱ्या बायपास रस्त्यावर वन विभागाच्या नर्सरीजवळ धुळ्याकडून येणारी ट्रक क्रमांक (टीएस.१३ युए.७६८०) वरील चालक (नाव-गाव माहित नाही) याने मोटार सायकलला जोरात धडक दिली. या अपघातात मोटार सायकलवरील दोघं तरुण जागीच ठार झाले. याप्रकरणी अर्जुन राकेश चव्हाण (रा.वासलेपाणी,ता. पानसमेल जि. बडवानी) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध भादवि कलम ३०४ (ए), २७९,३३७,३३८, ४२७ मोटार वाहन कायदा १८४,१३४ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका किशोर सोनवणे हे करीत आहेत.