जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे माजीप्रदेश सचिव सुनील बढे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी रविवारी सकाळी १०.३० वाजता भेट दिली.
तशी ही भेट पूर्वनियोजित होती, निमित्त होतं, चहापान व अल्पोहाराच बढे सध्या पक्ष संघटनेच्या कुठल्याही महत्वाच्या पदावर नसले तरी पक्षांतर्गत त्यांच्या विषयी राज्यातील बहुतांश सर्वच भाजप नेत्यांचा जिव्हाळा दिसून येतो. त्यामुळेच आपल्या व्यस्त दौऱ्यातही चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वतः हुन त्यांची घरी जाऊन भेट घेत त्यांच्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. एवढंच नव्हे तर बढे यांची कन्या जिचा महिन्यापूर्वीच विवाह झाला, म्हणून त्यांची कन्या भाग्यश्री व जावई प्रांजल यांना मोबाइल दूरध्वनीवरून नवं जीवनाच्या शुभेच्छाही दिल्या. प्रारंभी सुनिल बढे व आरती बढे यांनी पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी नगरसेविका उज्जवला ताई बेंडाळे, आशिष जोगी, भाजपचे महानगर सरचिटणीस नितीन इंगळे, डॉ. सुरळकर, उद्धवराव पाटील, सुनील नारखेडे, प्रकाश पंडित आदी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
















