मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. आता चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती अमित शाह यांना दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी या भेटीनंतर सांगितलं. तर, राज्यातील सद्यस्थितीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिल्याचे समजतेय.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस राजधानीत पोहचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलेय. राज्यातील महत्वाच्या दोन नेत्याच्या दिल्लीवारीनंतर राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. फडणवीस-पाटील यांच्या दिल्लीवारीनंतर मनसे-भाजप यांच्या युतीबाबत चर्चा रंगली आहे.