नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे कागदपत्रं आहे. सरकारी काम असो अथवा खासगी, आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी कामी येते. त्यामुळे आधारवरील माहिती अचूक असणे गरजेचे आहे. मात्र, आधारवरील जन्मतारीख (Date of birth) चुकीची असल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तुम्ही घरबसल्या आधारवरील माहिती दुरुस्त करू शकता. यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर देखील जाण्याची गरज नाही.
आधार कार्डवरील जन्मतारखेत असा करू शकता बदल
यासाठी सर्वात प्रथम UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही थेट ssup.uidai.gov.in वर देखील क्लिक करू शकता.
वेबसाइटवरील Update Aadhaar सेक्शनमध्ये जाऊन Update Demographics Data & Check Status पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाला १२ आकडी आधार नंबर टाका. कॅप्चा व्हेरिफिकेशन पूर्ण केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.
आता आधार कार्डवरील जन्मतारीख अपडेट करण्यासाठी ‘Update Aadhaar’ पर्यायावर क्लिक करा.
येथे तुम्हाला जन्मताराखी अपडेट करण्याचा पर्याय दिसेल. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रं देखील अपलोड करावी लागतील. या सर्व प्रोसेसनंतर तुमच्या आधारवरील जन्मतारखेत बदल होईल.
मात्र, लक्षात ठेवा की आधारवरील जन्मतीरख बदलण्यासाठी अथवा अपडेट करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.