चंदीगड (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होतील, असे ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केले आहे. आज दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय.
यापूर्वी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा हरीश रावत यांनी केली आहे. चरणजीत सिंह चन्नी अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. ते चमकौर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत. विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर चरणजीत सिंह चन्नी प्रथमच मीडियासमोर आले. त्यांना प्रसारमाध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आले, त्यावर त्यांनी राज्यपाल सभागृहातून बाहेर आल्यानंतर बोलू असे सांगितले. ते संध्याकाळी ६.३० वाजता राज्यपालांना भेटणार आहेत.
















