धरणगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य निर्मितीमध्ये अनेक लोक कल्याणकारी योजना राबवून 12 बलुतेदारांना समतेचा न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध होते असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्राध्यापक प्रदीप देसले यांनी जाहीर व्याख्याना प्रसंगी केले.
धरणगाव येथील छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व्यासपीठावर उपस्थित होते. व्याख्याते व प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिवस्मारक समितीचे प्रमुख चंदन पाटील यांनी करून दिला. तर शिवस्वरक समितीतर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवव्याख्याते प्रदीप देसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तसेच पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पाटील यांचा शाल श्रीफळ बुके देव सत्कार करण्यात आला.
प्राध्यापक देसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातीपातीचे राजकारण न करता त्यांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये सर्वात जाती धर्माचे लोक सहभागी होते. त्यांनी केवळ स्वराज्यासाठी आपलं आयुष्य सर्वत्र पणाला लावून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला म्हणून आजही देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श उदाहरण दिसून येते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज राजे असून आपल्या संपत्तीचा उपभोग शून्य स्वामी म्हणून त्यांची प्रसिद्धी होती.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते डी जी पाटील, अँड वसंतराव भोलाणे, भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष डीओ पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी जि प सदस्य जानकीराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिव स्मारक समितीचे गुलाबराव मराठे यांनी केले तर आभार गोपाल पाटील यांनी मानले.