मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचा सत्तासंघर्षाचा निकाल कधीही येण्याची शक्यता असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आहे. या भेटीमागचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण या भेटीमुळे चर्चेला जोरदार उधाण आले आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल आता कधीही जाहीर होऊ शकतो. तशात महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या पक्षाध्यक्ष पद सोडण्यावरून घडामोडी घडत आहेत. अगदी राज्यातील अनेक नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्यातील बैठकीत काहीतरी मोठा निर्णय होण्याची चर्चा आहे. अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. पण या भेटीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कारण या भेटीचा टायमिंग जास्त महत्त्वाचा असल्याचं बोलले जात आहे. कारण अचानक मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची भेट घेतल्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, ८ ते १२ मे या काळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालाला अवघे काही दिवस उरलेले असताना मुख्यमंत्री राज्यपालांच्या निमंत्रणावरुन राजभवनात पोहोचले असून राज्यपालांनीच भोजनाचं निमंत्रण दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात गेल्याची चर्चा आहे.
















