मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. यानंतर काँग्रेस नेते कमलनाथ आणि नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमचा एकही आमदार फुटला नसल्याचं यावेळी कमलनाथ यांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे कोविड पॉझिटिव्ह असून फोनवरुन त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. “काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला ४४ पैकी ४१ आमदार उपस्थित होते. तीन आमदार प्रवासात आहेत. काँग्रेस पक्षात एकता आहे,” असं कमलनाथ यांनी सांगितलं.