मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय विभागाला दिलेल्या चौकशीत परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेत. मुंबई पोलिस निलंबित अधिकारी सचिन वाझेला पुन्हा सेवेत रूजू करण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला होता, असा खळबळजनक जबाब परमबीर सिंह यांनी सीबीआय चौकशीत दिला आहे.
सीबीआयने शंभर कोटी प्ररकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राला परमबीर सिंह यांचा जबाबही जोडला होता. तर, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणी माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर करण्यात आला आहे. देशमुखांवर पदाचा दुरुपयोग केल्याचा आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. परमबीर यांचा जबाबाची प्रत सोमवारी उशिरा उपलब्ध झाली. देशमुखांवर पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.
परमबीर यांनी जबाबात दावा केला आहे की, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सहाय्यक सुरा चौहानची भेट घेतली आणि वाझे यांना पुन्हा नियुक्त करण्यास दबाव टकला होता. आपण आदित्य यांच्याशी याबद्दल बोललो असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलण्यास सांगितले. त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यावेळी त्यांनी वाझे यांना पुन्हा पोलीस दलात सामावून घेण्यास सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री आणि देशमुख यांच्या दबावामुळे वाझे यांना पुन्हा सेवेत सामावून घेतल्याचा दावा परमबीर यांनी केला आहे.
















