चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील चोपडा शहर कक्षातील सहाय्यक अभियंत्याने नवीन विद्युत मीटर बसवून देण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच मागितली आणि ती कार्यालयातच स्वीकारली. या प्रकरणी जळगाव एसीबीने त्या अधिकार्याला अटक केली आहे. अटक केलेल्या अधिकार्याचे नाव अमित दिलीप सुलक्षणे (वय 35, राहणार प्लॉट नं. 60, बोरोले एक, चोपडा) आहे. या कारवाईमुळे लाचखोरी करणाऱ्यांच्या गटात मोठी खळबळ उडाली आहे.
23 वर्षीय तक्रारदाराकडे नवीन वीज मीटर बसवून देण्याकरिता सहायक अभियंता अमित सुलक्षणे याने मंगळवार, 11 मार्च रोजी साडेपाच हजार रुपये लाच मागितली. तक्रारदाराने साडेचार हजार रुपये देण्याचे ठरवले आणि एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने लाच पडताळणी केल्यानंतर सापळा रचला आणि बुधवारी सायंकाळी सुलक्षणे याने कार्यालयातच लाच स्वीकारली. त्यानंतर सुलक्षणे याला अटक करण्यात आली. चोपडा शहर पोलिसांत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव. ळगाव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, प्रणेश ठाकूर, मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.