चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील चोपडा शिरपूर रस्त्यावरील गलंगी गावाजवळ दोघांकडून ३९ हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
तालुक्यातील चोपडा शिरपूर रस्त्यावरील गलंगी गावाजवळ दोन तरुण मोटारसायकलने (एम.एच. १९ ए.जे. ८५९६) गांजाची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चोपड़ा शिरपूर रस्त्यावरील गलंगी जवळ कारवाई केली असता अश्फाक रेहमान पिंजारी (वय ३२, रा.लासगाव ता. पाचोरा) व शेख रियाज शेख जाकीर (वय २६, रा. सिल्लोड) यांच्याकडून ३९ हजार किमतीचा साडे सहा किलो गांजा मिळून आला.
पोलिसांनी गांजा व ४० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ७ रोजी रात्री १० वाजता करण्यात आली, दोघांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितननवरे, हवालदार राकेश पाटील, रावसाहेब पाटील यांनी केली असून शासकीय पंच म्हणून नायब तहसीलदार सचिन बांबळे उपस्थित होते. दोघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.