चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील मजरेहोळ फाट्याजवळ अमळनेरकडून येणाऱ्या कारचे टायर फुटल्याने मारुती कार ही समोरच्या एसटीला जाऊन जोरात धडकली. या अपघातात कारमधील तीन जण जागेवर ठार झाले तर एक गंभीर जखमी असून त्याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर असे की, मारुती सुझुकी कार क्रमांक (एम एच 14 एफ एम 7202) अमळनेरकडून चोपड्याकडे येत असताना सूतगिरणी व मजरेहोळ फाट्याचा दरम्यान मारुती सुझुकी कारचे टायर फुटले. त्यामुळे कार समोरून चोपड्याकडून येणारी शिवशाही चोपडा नाशिक या बसला जाऊन जोरात धडकली. यात निलेश श्रीधर वाणी व शैलेश श्रीधर वाणी या दोघं सख्या भावांच्या मृत्यू झाला असून यांच्या मित्र जितेंद्र मुरलीधर भोकरे हा सुद्धा जागेवरच मरण झाला. तिघांचे जागेवरच मृत्यू झाला तर ओंकार प्रविण खोंड हा गंभीर जखमी असुन यांच्यावर पुढील उपचार चोपडा उपजिल्हा रुग्णालयात सुरू असून ही घटना सकाळची 6 वाजे दरम्यानची असून मयतामध्ये निलेश व शैलेश हे दोघे सख्खे आहे. हे सर्व निजामपूर जि धुळे येथील मूळ राहणारे असून हल्ली मुक्काम नाशिक होते. ते नाशिकहून रात्री 11 ते 11;30 च्या दरम्यान निघाले होते ते यावल तालुक्यातील मनुदेवी येथे दर्शनासाठी जात असल्याचे कळते. तिघे मयत हे 50 वयोगटातील सांगण्यात आले.