जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांची मोठी लसीकरण मोहीम राबविण्याचे सुनिश्चित केलेले आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण भागात इंटरनेटच्या तांत्रिक अभावामुळे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरण केंद्रावर थेट नोंदणी करण्याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी पत्राद्वारे निवेदन दिले आहे.
सध्या कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक स्तरातून लसिकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपले लसीकरण व्हावे यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर लासिकेंद्राच्या बाहेर मोठ्या रांगा लावत आहेत. ग्रामीण भागात इंटरनेटचा अभाव असल्यामुळे आणि लसीकरण केंद्र आरोग्य सेतू ॲपवर उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची समस्या आणि लसीकरणाची महत्त्व हेरून खासदारांनी आरोग्य मंत्र्यांना ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरण केंद्रावर आरोग्य सेवकांच्या माध्यमातून नोंदणी करून लसीकरण करण्याबाबत निवेदन दिले आहे. त्यामुळे लसिकरणासाठी केंद्रांवर होत असलेली नागरिकांची गर्दी कमी होऊन सुरळीत लसीकरणाचा मार्ग प्रशस्त होऊन नागरिकांचे यशस्वी लसीकरण होऊ शकेल. याबाबत आरोग्य मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन ग्रामीण भागातील इंटरनेटचा अभाव आणि मोठ्या जनसमुदायातील नागरिकांचा विचार करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेवकांच्या माध्यमातून त्वरित उपाय योजना राबविण्याचे निवेदन खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्राच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला केले आहे. यामुळे लवकरच नागरिकांना लसीकरण केंद्रावर आरोग्य सेवकांच्या माध्यमातून लसीकरण नोंदणीची सुविधा मिळून त्यांना स्वतःचे लसीकरण करून घेता येईल.