साकळी ता. यावल (किरण माळी) एकीकडे रिचार्जचा दर वाढत असताना दुसरीकडे नेटवर्कच मिळत नसल्यामुळे पैसे देऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वच कंपन्यांचे प्लॅन हे मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक असल्यामुळे दिवस तर संपत आहे; परंतु सेवेचा लाभ घेता येत नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
साकळीसह परीसरात मोबाईल नेटवर्क, रेंज मिळत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी, व्यापारी यांना केळी कापणी, वाहतूकीसह अन्य कारणांमुळे संपर्का अभावी ताळमेळ बसत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच विद्यार्थींना ऑनलाईन क्लास जॉईंन करायाला ही अनेक अडचणी येत आहे.
मोबाईल नेटवर्क रेंज मिळत नसल्याने नुकसानीसह आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे. सध्या कोरोना महामारी संकट काळ असल्याने शासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यावरच शिक्षण विभागाने व शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता मोबाईल द्वारे ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा आधार घेत पाठ्यक्रम देण्याची योजना आखली आहे. मात्र गावातील गावातील मोबाईल टॉवर्स नुकसान झालेच शोपिस ठरले असून मोबाईल ला नेटवर्कर व रेंज मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण अध्ययन पद्धतीच्या अभ्यास क्रमापासून मुकावे लागत आहे. व भविष्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि शैक्षणिक नुकसान झालेच तर त्यास जबाबदार कोण ? संबंधित मोबाईल कंपनीच्या बऱ्याच अधिकारी सह विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. तरी दुरसंचार विभागाचे वरिष्ठ अधिकारीसह संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देवून जनसामान्य जनतेसह विद्यार्थी, शेतकरी व्यापारी यांना नाहक होणार्या त्रासातून मुक्त करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत अशी मागणी सुज्ञ ग्रामस्थांकडून होते आहे.