धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बेलदार मोहल्ला भागात दोन गटात हाणामारी झाली असून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
याबाबत साबेरा सैफौद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३० ऑक्टोबर रोजी माझ्या पतीने शहरात समाजाच्या जो विषय चालू आहे, त्याच्यात आमची बदनामी केली. तुम्हाला शहरात राहु देणार नाही असे म्हणून रियाउद्दीन शेख लाडजी, २) शेख प्यारा लाडनी शेख ३) जावेद शेख प्यारा, ४) जमाल्लोद्दिन शेख गयासोद्दीन (सर्व रा. धरणगाव) व त्यांच्यासोबत दोन ते तिन इसम त्याचे नाव गाव माहित नाही, अशांनी लाथा-बुक्क्यांसह लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच घरातील सामान फेकाफेक करुन नासधूस करत शिवीगाळ व धमकी देवून घरातून निघून गेले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पो.ना. उमेश पाटील हे करीत आहेत.
तर रियाउद्दीन शेख लाडजी (वय – ५२ धंदा-मोबाईल रिपेयरिंग रा. बेलदार मोहल्ला) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्या सिग्मा मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानावर असतांना जुनेद शेख सैफोद्दीन, उबेद शेख सैफोद्दीन, मोईन शेख सैफोद्दीन, जुनेद शेख सलीम, उवेद अदील खान (सर्व.रा. बेलदार,मोहल्ला) अशांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन दुकानामध्ये लाठ्या काठ्या घेवून आले. तसेच उबेद शेख यांने तु जर मिटींग घेतली तर तुझा मर्डर करुन टाकेल, असे बोलून सर्वांनी लाथा बुक्यांनी मारहाण करु केली. तसेच हातातील काहीतरी लोखंडी वस्तूने फिर्यादीस डोक्यास कपाळावर मारहाण करुन दुखापत केली. दुकानाच्या काच्या व इतर सामानाचे नुकसान केले. या भांडणात गळ्यातील चैन कुठेतरी तुटून पडल्याने ती मिळुन आली नाही. तसेच मिटींग जर घेतली तर तुला व परिवाराला जिवे ठार मारुन टाकू, अशी धमकी देवून निघून. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पो.ना.प्रमोद पाटील हे करीत आहेत.