श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्याकडून एके ४७ रायफल, पिस्तूल आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, सुरक्षा दलाने परिसरात शोधमोहिम हाती घेतली आहे.
जम्मू-काश्मीरच्या बडगाममधील मोचवा येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या जोरादार चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. शिवाय, जवानांनी एक AK-४७ रायफल आणि पिस्तूल देखील जप्त केली आहे. याचबरोबर संबंधित परिसरात जवांनाकडून शोधमोहीम राबवली जात आहे. जम्मू-काश्मीरच्या बनिहालमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याचेही समोर आले आहे. शुक्रवारी उशीरा झालेल्या या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांमध्ये ग्रेनेड हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. या अगोदर गुरूवारी काश्मीरच्या बेमिनामध्ये सीआरपीएफच्या पोस्टवर ग्रेने हल्ला झाला होता.