TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विभागीय क्रीडा संकुलाची डिझाईन साकार करतांना स्थानिक खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या क्रीडा सुविधांना प्राधान्य द्या : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2023
in क्रीडा, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार व प्रकल्प सल्लागार (आर्किटेक्चर) म्हणून मुंबईचे शशी प्रभू आणि असोसिएट्स यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीने आज नाव निश्चित केले. लवकरच त्यांना कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील नावलौकिकात भर टाकणारे विभागीय क्रीडा संकुलाची डिझाईन साकारतांना जिल्ह्यातील स्थानिक खेळांना प्रोत्साहन व उत्तेजन मिळेल. अशा क्रीडा सुविधांना प्राधान्य देण्यात यावे. यासाठी स्थानिक उद्योजक, क्रीडा प्रेमी व संघटनांच्या सूचनांचा विचार करण्यात यावा. अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा नियोजनामधील कामे व साहित्य संमेलनाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, उद्योजक अशोक जैन, अतुल जैन, बांधकाम व्यावसायिक भरत अमळकर, सार्वजनिक बांधकाम प्रशांत सोनवणे, क्रीडा संघटनाचे पदाधिकारी राजेश जाधव , शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रदीप तळवेलकर व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

शशी प्रभू आणि असोसिएट्स यांनी सादर केली कल्पना, डिझाईन, योजना व आराखडा सर्वोत्तम ठरल्याने त्यांची निवड झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांचा समावेश आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी दूरध्वनीवरून ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याशी संवाद साधत ही अंतिम निवड जाहीर केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला विभागीय क्रीडा संकुलांच्या माध्यमातून उभारी मिळणार आहे.

आराखड्या फीच्या माध्यमातून ५ कोटींची बचत !

शासन निर्णयानुसार वास्तूरचनाकार आराखड्याची ४ टक्के फी ठरलेली असते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या समितीने मंत्री गुलाबराव पाटील समितीने शशी प्रभू आणि असोसिएट्स यांच्याशी वाटाघाटी करत ही फी २ टक्क्यांपर्यंत आणली आहे. यामुळे ५ कोटींची बचत झाली आहे.

केळी पीक विम्याबाबत ९० टक्के शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविल्या

जिल्ह्यात ८५ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यात अडचणी येत होत्या. यासाठी गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री म्हणून स्वतः कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांंना दिल्या आणि त्यांच्या पीक विम्यासंदर्भातील तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात आले. यामुळे आता ७५ हजार शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा भरपाई मिळणार आहे. उर्वरित १० हजार शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटीबध्द आहे. अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन मधील प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश, प्रत्यक्ष सुरू असलेले कामे, मंजूर कामे तसेच २०२४-२५ चा जिल्हा नियोजन आराखडा या आढावा घेतला. साहित्य संमेलनानच्या अनुषंगाने अमळनेर शहरात करावयाच्या प्रस्तावित विकास कामे व सुविधांविषयी पालकमंत्र्यांनी यावेळी चर्चा केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
Next Post

दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला ; आईसह दोन मुलांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी जाणून घेतली महिला सुरक्षा कायद्याविषयी माहिती !

October 6, 2022

वर्षभरानंतर अनिल देशमुख कारागृहाबाहेर, स्वागतासाठी अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची विशेष उपस्थिती !

December 28, 2022

४१२ कोटी ऑनलाईन फ्रॉड प्रकरण : आणखी चार आरोपींना अटक !

October 17, 2020

राज ठाकरेंना दिलासा ; चौदा वर्षापूर्वीच्या प्रकरणातील अटक वॉरंट रद्द

June 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group