जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडदा येथील मुळ रहिवासी व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिपीक नितीन हिम्मतराव पवार (वय 45, ह.मु.उमेशपार्क, मोहाडी शिवार जळगाव) यांचे आज दि. 7 रोजी सकाळी 6 वाजेला अल्पशः आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर मेहरूण वैकुंठधाम येथे सकाळी 11.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ऋषिकेश व सिध्देश अशी दोन मुलं, दोन बहिणी, एक भाऊ, दोन काका असा परिवार आहे. ते ईश्वर पवार यांचे लहान बंधु व वावडदा गावचे माजी सरपंच हिम्मतराव चुनीलाल यांचे कनिष्ठ चिरंजीव होत.