चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील मालापुर येथे आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपणारा उत्सव म्हणजेच भोंगऱ्या बाजाराच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार हे उद्या दि.१९ मार्च रोजी चोपड्यात येणार असल्याची माहिती डॉ चंद्रकांत बारेला यांनी दि.१७ रोजी संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आमदार रोहित पवार यांचे दि.१९ रोजी सकाळी १० वाजता अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी आगमन होणार आहे. ११.३० वाजता डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या घरी आदिवासी पेहराव परिधान करतील. १२ वाजता जनसेवा हॉस्पिटल शेजारीच कार्यकर्त्यांशी संवाद साधतील त्यानंतर मालापुर गावाकडे भोंगऱ्या बाजाराच्या उद्घाटनासाठी रवाना होतील.
यावेळी पक्षाचे नेते अरुणभाई गुजराथी, एकनाथ खडसे, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, सुनील भुसारा, जयंत वानोळे, रविंद्र पाटील, उमेश पाटील, रोहिणी खडसे, वंदना चौधरी यासह नेते, ादाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. चंद्रकांत बारेला यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चोसाका माजी चेअरमन अतुल ठाकरे, समाधान माळी, सचिन दाभे, अमोल राजपूत, राजन पवार उपस्थित होते. या उत्सवातील आदिवासी संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी यावे असे आवाहन डॉ बारेला यांनी यावेळी केले.