TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा : आ.एकनाथराव खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
July 5, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (प्रतिनिधी) शेतकरी बांधवांची तूर खरेदी करताना काही व्यापारी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात तूर खरेदी करून शेतकरी बांधवांची लूट करत असल्याबाबत आज (दि.५) आ .एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदमध्ये प्रश्न उपस्थित केला.

यावेळी खडसे म्हणाले की, तूर खरेदीसाठी शासनाने ठरविलेल्या आधारभूत किंमतीपेक्षाही काही व्यापारी, संस्था शेतकऱ्यांकडून कमी भावात तूर खरेदी करतात. यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान होत आहे. अशा कमी भावात तूर खरेदी करणाऱ्यांवर शासन गुन्हे दाखल करणार काय? असा प्रश्न उपस्थित करून राज्यात नेमकी किती तूर खरेदी केंद्रे सुरु आहेत? आणि शेतकरी उत्पादक कंपनीला तूर खरेदीची परवानगी देताना ठराविक तूर खरेदीची मर्यादा घातली जाते, ती मर्यादा संपल्यानंतर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची अडचण होते. त्यामुळे ती मर्यादा काढून टाकावी आणि ज्या ठिकाणी खरेदी विक्री सहकारी संघ तूर खरेदीसाठी सक्षम असतील आणि त्यांनी परवानगी मागितली तर तूर खरेदी करण्यासाठी खरेदी विक्री संघांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी केली.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

यावर कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, शासनाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात तूर खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीची मर्यादा घालून देण्यात आली असली, तरी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणल्यास सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाईल. १५३ शासकीय तूर खरेदी केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आले होते. खरेदी विक्री संघ ही शासनाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे जो खरेदी विक्री संघ शासनाच्या सर्व अटीशर्तींच्या अधीन राहून तूर खरेदी करण्यासाठी सक्षम असेल त्यांचे डी.डी.आर. कडून प्रस्ताव मागवण्यात येतील आणि त्यावर निर्णय घेण्यात येईल असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

बोदवड तालुक्याला डार्क झोन मधून वगळण्यात यावे- एकनाथराव खडसे

बोदवड तालुक्याचा समावेश डार्क झोन मध्ये असल्याने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळत नाही त्यामुळे बोदवड तालुक्याला डार्क झोन मधून वगळण्यात यावे अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये केली. यावेळी आ एकनाथराव खडसे म्हणाले जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील जवळपास सर्वच गावांचा डार्कझोन मध्ये समावेश आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विंधन विहिर साठी मिळणारे अनुदान मिळत नाही त्याचप्रमाणे इतर शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.

तालुक्यातील गावांचे बऱ्याच वर्षांपूर्वी भुजल सर्वक्षण झाले होते त्याआधारावर तालुक्याचा डार्क झोन मध्ये समावेश करण्यात आला होता परंतु आता पुष्कळ कालावधी उलटला तरी भुजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण झालेले नाही जलयुक्त शिवार योजनेत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवले गेले. त्यामुळे भूगर्भातील जलपातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे बोदवड तालुका डार्कझोन मधून वागळण्याच्या संदर्भात पुन्हा एकदा भुजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण करून हा तालुका डार्कझोन मधून वागळण्यात यावा अशी आग्रही मागणी आ.एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: eknath khadseMSP

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर भर देणार : सौ. उषा जैन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल !

February 26, 2022

ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल !

October 22, 2022

‘मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता’ : मनसे नेते संदीप देशपांडे

May 22, 2021

बीएचआर घोटाळा : कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो? : खडसे

June 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group