धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमात पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी बदनामी करणारे वक्तृत्वाबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी समस्त बहुभाषिक ब्राह्मण महासंघाने आज धरणगाव तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
समस्त बहुभाषिक ब्राह्मण महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि १९ एप्रिल २०२२ रोजी सांगली येथे राष्ट्रवादी पक्षाच्या जाहीर सभेत असंख्य लोकांच्या उपस्थितीत पक्ष्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदूचे दैवत श्री हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा संदर्भात अत्यंत निंदनीय अभद्र भाषेत टिपणी करून समस्त हिंदू समाजाचा जाणीव पूर्वक अवमान केला. त्याच भाषणात हिंदू विवाह पद्धतीतीत असलेल्या अत्यंत पवित्र असा एक धार्मिक संस्कार “कन्यादान” बाबत त्या संस्कारात अर्थ समजून न घेता केवळ “दान “या शब्दाच्या खोड्या करत छदमीपणे हसत तो संस्कार सांगणाऱ्या ब्रह्मन् पौरोहित्य बद्दल टिंगल टवाळी केली. “मम भार्या समर्पित” असे कुठेलेही शब्द वाक्य कन्यादान संस्काराच्या विधीमध्ये नसतात. परंतू ते तसे म्हंटले जाते असे सांगत त्या अतिशय पवित्र संस्कार्यच्या व तो संस्कार सांगणारे व करवून घेणाऱ्या समस्त पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणांचा अपमान केलेला आहे. त्यातून मुली म्हणजे दान देन्यासारखी वस्तू असल्याचे सूचक वक्तव्य केलेले आहे. त्यावरून समस्त स्त्री वर्गाकडे बघण्याचा मेटकरी यांचा गलीच्छ दृष्टिकोन स्पष्ट दिसतो आहे.
कन्यादान हे संकल्पना अतिशय उदात्त आहे. आई वडिलांनी जीवापाड सांभाळ केलेल्या मुलीला तिचा होणार पती व त्याचे कुटुंबीय यांचेकडे सुपूर्त करताना आम्ही जशी तिची काळजी घेतली त्याच प्रमाणे तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेणारा पती व त्याचे कुटुंबीय यांची असल्याचे व त्यांचेकडुन वचन घेण्याचा संकल्प करून घेण्याचा हा विधी आहे आणि हा विधी हिंदू धर्मातील सर्व समाजात व जाती धर्मात याच उद्देशाने थोड्याफार फरकाने केला जातो. असे असताना मिटकरी यांनी ज्या पद्धतीने भाषणात पवित्र कन्यादान विधीचा व तो सांगणाऱ्या समस्त जातीधर्मातील पौरोहित्याचा जो अपमान, टिंगलटवाळी केली त्यामुळे समाजामध्ये विषेशतः समाजातील जातीपातीमध्ये वैरत्वाची भावना ‘HATERADE’ असल्याची भावना निर्माण झालेली आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाचे नेते व महाराष्ट्रातील मंत्रीमंडळातील प्रमुख मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे हेही त्याच व्यासपीठावरून मिटकरी यांचे वर उल्लेखलेल्या वक्तव्याचा विरोध करण्याऐवजी मन्सोक्त हसत त्याची मजा घेत होते. इतकेच नव्हे तर जयंत पाटील यांनी मिटकरी यांना लोक म्हणा असे म्हणत उदुक्त केले. हा प्रकार अत्यंत किळसवाणा असून त्याची गंभीर दखल घेणे व श्री मिटकरी व संबंधितांवर १५३ १५३(A), १५३(AA) अन्वये गुन्हे दाखल करून त्यांचेवर कडक कायदेशीर कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे. श्री. मिटकरी यांचे या कृत्यामुळे जनमानसात मनामनामध्ये प्रक्षोप निर्माण झाला आहे. त्यांच्या भाषणाची लिंक https://youtu.be/ciGBIGwILIK हि लिंक व त्याचे भाषण पुरावा म्हणून ग्राहा धरण्यात यावे. तरी विनंती की, वरील सर्व कारणांचा विचार होऊन श्री मिटकरी व संबंधितांवर कठोर व तात्काळ कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा, असेही बहुभाषिक ब्राह्मण संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर भारती श्रीकांत भावे, दिलीप प्रदीप जोशी, लीना प्रसन्ना उपासनी, वर्षा परेश नाईक, आशा प्रमोद जोशी, शुभदा दलित उपासणी, प्रणिता किशोर शुक्ल, विनय बळवंत काकरे, शुभांगी संजय शुकस, परेश सिताराम नाईक, विनोद मदन शुकला, अथर्व संजय शुक्ल यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.