जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजबील तोडणी संदर्भात आ. मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी जळगाव येथील अधिक्षक कार्यालयात अधिक्षक अभियंता यांना खुर्चीला बांधून मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी अधिक्षक अभियंता मोहंमद फारुक मोहंमद युसूफ शेख यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मोहंमद फारुक मोहंमद युसूफ शेख (वय – ५७) यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मी महावितरण जळगाव मंडळ कार्यालय, अजिठा लॉनच्या पाठीमागे, एमआयडीसी, जळगाव येथे अधीक्षक अभियंता म्हणुन ०१ जुन २०१८ पासुन कार्यरत आहे. माझ्याकडे संपुर्ण जळगाव जिल्हयाचे कामकाज माझ्या देखरेख खाली चालते. आज दि. २६ मार्च २०२१ रोजी सकाळी ११.०० ते ११.३० वाजेचे दरम्यान मी विदयुत भवन महा वितरण येथील मंडळ कार्यालयात हजर असतांना मला माझ्या मोबाईल वर फोन आला की, आमदार मंगेश चव्हाण तुमच्याशी बोलणार आहेत असे सांगून फोनवरु मी चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण बोलतोय असे म्हणुन आपण जळगावमध्ये आहेत का? बाबत विचारणा केली असता मी त्यांना जळगाव येथे असल्याचे सांगीतले.
आमदार चव्हाण यांनी मला तुमची भेट घ्यावयाची आहे. बाबत कळवून मला दुपारी ०४.०० ते ०४.३० वाजता येण्याचे सांगीतले. आमदार चव्हाण हे मला भेटण्यासाठी येणार म्हणुन मी माझे कार्यालयात हजर होतो, सायंकाळी ०४.४५ वाजेचे सुमारास मला आ. चव्हाण यांचा परत फोन आला. त्यांनी मला फोनवरुन विचारले की, आपले कार्यालय कुठे आहे. म्हणून मी त्यांना आमचे कार्यालय हे अजिंठा लॉनच्या पाठीमागे, एमआयडीसी येथे असल्याचे सांगीतले. सायंकाळी ०५.०० वाजेचे सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातुन मला कलेक्टर साहेबांनी भेटण्यासाठी फोनद्वारे निरोप दिला होता. म्हणुन मी माझे कार्यालयातुन सायंकाळी ०५.१० वाजेचे सुमारास कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी जात असतांना समोरुन आ. मंगेश चव्हाण व त्याचे सोबत ४०/५० लोक असे आमचे कार्यालयात आले. त्यांना मी कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी जात असल्याचे सांगत असतांना आमदार चव्हाण यांनी मला “तु पहिले तुझ्या कार्यालयात चल आम्हाला तुझ्याशी बोलायचे आहे. असे सांगीतल्यावर मी माझ्या कार्यालयात आलो तेव्हा माझे कार्यालयात आ. चव्हाण व त्यांचे सोबत ४०/५० लोक आत आलेत व आ. चव्हाण हे मला पाहुन तुम्ही शेतीचे पंपाचे ईलेक्ट्रीक कनेक्शन कसे तोतडात, शेतकरी येथे मरायला लागलेत, तुम्ही त्यांचे शेतीचे कनेक्शन का तोडले? तुझा बाप शेतकरी आहे का? असे मोठ मोठयाने बोलुन तुला जास्त माज आला आहे. तु माझे काही एक वाकडे करु शकत नाही, तुला कुठे जायचे आहे तिथे जा!” असे एकेरी भाषेत बोलुन माझे अंगावर धावुन येवुन मला हाताची मुठ वळुन माझे अंगावर धावुन मला धक्का बुक्की करुन तुला पैसे पाहिजे आहेत का? असे बोलुन माझे अंगावर त्यांचे हातातील विज बिलाचे पैसे फेकलेत तेव्हा आमदार चव्हाण यांचे सोबत माझे कॅबीनमध्ये आलेले लोक यांनी सुध्दा मोठ मोठयाने आरडा ओरड करुन आमचे शेताचे ईलेक्ट्रीक कनेक्शन का तोडतो असे बोलून या रांडच्याला जास्त झाले आहे. अशी अश्लील शिवीगाळ करु लागले, आ. चव्हाण यांनी त्यांचे सोबत आलेले लोकांना “याला बांधारे, हा मादरचोदाला जास्त मस्ती आली आहे” असे बोलून त्यांचे हातातील दोराने त्यांनी मला माझे खुर्चीला बांधुन माझ्या गळयात चपलांचा हार टाकला. आमदार चव्हाण हे मला तुझ्या मोठया साहेबाला बोलव, तुझा मंत्री फोन उचलत नाही, तुम्हाला सर्वांना जास्त झाले आहे. असे बोलुन आमदार चव्हाण व त्यांचे सोबत आलेले ४०/५० लोक हे मोठ मोठयाने आरडा ओरड करुन कॅबीनमधील साहीत्य अस्ता वेस्त करुन खिडकीचे पडदयांची तोड फोड करीत असतांना आमचे कार्यालयात हजर असलेले विवेक गोपीचंद शिरसाठ व नंदकुमार हिरामण उमप अशांनी आमदार सोबत आलेल्या लोकांना समजावत होते. परंतु ते काहीएक ऐकत नव्हते. त्यावेळी तेथे पोलीस आल्यावर पोलीसांनी माझी आ. चव्हाण व त्यांचे सोबत आलेल्या लोकांपासुन सुटका केली.
आमदार मंगेश चव्हाण हे चाळीसगाव मतदार संघातील आमदार असल्याने मी त्यांना ओळखतो. मला आमदार चव्हाण व त्यांचे सोबत आलेले ४०/ ५० लोकांनी धक्का बुक्की व मारहाण केल्याने माझ्या डाव्या हाताचे बोटास दुखापत झालेली आहे. तरी माझी आमदार मंगेश चव्हाण व त्यांचे सोबत आलेले ४० ते ५० लोकांनी मी माझ्या कार्यालयात सरकारीकाम करीत असतांना मला धक्काबुक्की व बळाचा वापर करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करुन मला शासकीय काम करण्यापासुन परावृत्त केले तसेच मला मारहाण तसेच अश्लील शिवीगाळ केली. अशी फिर्याद अधीक्षक अभियंता मोहंमद फारुक मोहंमद युसूफ शेख यांनी एमआयडीसी पोलिसात दिली आहे.
















