रावेर (प्रतिनिधी) समर्थ बुथ अभियानअंतर्गत भारतीय जनता पार्टी रावेर शहर व ग्रामीण बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांची आढावा बैठक माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख आढावा बैठकीमध्ये माजी मंत्री आ. गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांच्यासह सर्व उपस्थित बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांना येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी प्रोत्साहित करून सशक्तीकरणाचे धडे दिले. तसेच बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख हा फक्त निवडणुकी पुरता कार्यकर्ता नसून त्यांच्या माध्यमातुन केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यत पोहचवणारा एक दुवा असतो. म्हणून आपला बुथ मजबूत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या जसामान्य नागरिकाशी संबंधित योजना तळागाळातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, निराधार जेष्ठ नागरिक व गोरगरिबांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहचावी या संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी सदर बैठकीस माजी मंत्री आ. गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे, उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, प्रल्हाद पाटील, जि.प.सदस्य कैलास सरोदे, नंदाताई पाटील, कृ.उ.बा.समिती सभापती गोपाळ नेमाडे, प.स.सभापती कविता कोळी, उपसभापती सावळे, बुथ संयोजक प्रभारी श्रीकांत महाजन, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, सारिका चव्हाण, सावदा शहराध्यक्ष पराग पाटील, रावेर शहराध्यक्ष दिलीप पाटील यांच्या सह समस्त बुथ व शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.