नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कॉमेडियन आणि उत्तर प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांचे निधन झाल्याचे वृत्त टीव्ही ९ दिले होते. परंतू राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर येत आहे.
राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी एम्स इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. त्या दिवसापासूनच त्यांच्यावर उपचार सुरू होते. राजू जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआऊट करत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर ते बेशुद्ध झाल्यानं त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्यानं उपचार सुरू होते. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना व्हेटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या दोन तीन दिवनसांपासून त्यांना शुद्ध नव्हती. राजू यांच्या अँजिओग्राफीत त्यांच्या ह्रद्यात १०० टक्के ब्लॉकेज आढळून आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरही अनेक नेत्यांची त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासनही देण्यात आले होते. राजू श्रीवास्तव यांची कारकीर्द राजू श्रीवास्तव यांची ओळख चांगले कॉमेडियन म्हमून होती. लहानपणापासूनच त्यांना विनोदाची आवड होती आणि त्यांना कॉमेडियनच व्हायचे होते. टी टाईम मनोरंजन या टीव्ही शोमधून राजू यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. दूरदर्शनवर येणाऱ्या कार्यक्रमांत राजू श्रीवास्तव हे ब्रजेश हरजी, सुरेश मेनन यांच्यासोबत सह कलाकार म्हणूनही कार्यरत होते. द ग्रेट इंडियन लाफ्ट चॅलेंज या कार्यक्रमातून राजू श्रीवास्तव हे नाव घराघरात पोहचले. या कार्यक्रमात त्यांच्या विनोदाने आणि त्यांच्या उत्तर प्रदेशी ढंगाच्या भाषेमुळे ते लोकप्रिय ठरले होते.