मुंबई (वृत्तसंस्था) एप्रिल महिन्यानंतर प्रथमच धारावीत रुग्णसंख्या शून्यावर आहे. १ एप्रिलला पहिला रूग्ण धारावीत मिळाला होता, त्यानंतर पहिल्यांदाच धारावीतून एकही रूग्ण मिळालेला नाही.
राज्यात शुक्रवारी ३४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. १४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आणि ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या १९.१३ लाख झाली आहे. यातील १८.०६ लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर ४९ हजार १२९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ५६ हजार ८२३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईतील उपनगर आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत शुक्रवारी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाहीत. येथे १ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून असे प्रथमच घडले. धारावीने ज्याप्रकारे कोरोनावर नियंत्रण मिळवले त्या कार्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कौतुक केले होते.
















