पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) पातोंडा ते खवशी या रस्त्याचे कामकाजाला सुरुवात करण्यात आली असून ग्रामस्थ आनंदी झाले आहेत.
खवशी पातोंडा, खेडी अमळगाव या परिसरातील ग्रामस्थानी अनेक वेळेस रस्तेच्या कामासंदर्भात लोकप्रतिनिधि, जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे समस्याचे निवदेन देण्यात आले होते. आज कित्येक दिवसाची मागणी अखेर पूर्ण झाली असुन रस्तेच्या कामाला सुरवात झाली. कचखडी, खड़ीचा ढिग करून ठेवला आहे. तसेच हे काम आता जलदगतीने व्हावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थाची आहे. या रस्तेचे महत्व शिरपुर, सेंदवा बड़ी बिजासनी देवी कडे जाण्याचा मार्ग आहे.
पातोंडा परिसरातील वाहन चालक यांना हा रस्ता सोयीस्कर आहे. तसेच या रस्तेच्या कामासाठी खवशी ग्रामस्थांनी रस्त्यावर बसून आंदोलन, तर रस्त्यावर पडलेले खड्यात वृक्ष मोहिमच राबावली होती. तसेच मागील वर्षी खवशी येथील तरुणांनी खड्यात माती टाकून खड्डे बुजवले होते. खवशी येथील ग्रामस्थ पातोंडा येथे आठवड़े बाजारसाठी बजार करण्यासाठी तसेच दवाखानानिमित्त तर बँकच्या कामकाजसाठी येत त्याना रस्तेचा मनस्ताप सहन करून यावे लागत होते तर पावसाळ्यात जिकरीचे हाल होत होते. अनेक वेळेस या रस्तेचे प्रचंड दुरवस्थाचे बातमी प्रसिद्ध केले असून आता या रस्त्याचे कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे.