पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी झालेल्या शेती पीक गहू, मका, बाजरी, दादर आणि अन्य पिकांची नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. तर दुसरीकडे माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्यामुळे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी तहसीलदार व कलेक्टर साहेबांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लगेचच पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहचून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली आहे. त्यांनी आज धरणगाव तालुक्यात सकाळ पासून विविध गावांना भेटी देत पाहणी केली.
यावेळी प्रतापराव पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून झालेल्या नुकसानी बाबत माहिती जाणून घेत बळीराजाचा धीर दिला. यावेळी नितीन पाटील, पप्पू पाटील, माजी सरपंच आबा पाटील, निलेश मराठे, समाधान मराठे , विनोद मराठे, तुषार पाटील, आबा माळी, नितीन बिर्ला याच्या शेतात जाऊन पाहणी केली.