मुंबई (प्रतिनिधी) शिंदे गटाच्या महाराष्ट्र शिवसेना उपनेतेपदी राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा माजी पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केला. यावेळी जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज चौधरी देखील उपस्थित होते.
शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महाराष्ट्र उपनेतेपदी माजी पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील यांची निवड राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे साहेब नुकतीच केली आहे. या निवडीबद्दल जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील सर यांनी गुलाबराव पाटील यांचा मुंबई येथे सत्कार केला. यावेळी जळगाव विभाग प्रमुख विलास चौधरी,जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज चौधरी,स्वीय सहाय्यक गोविंद पाटील, मोतीआप्पा पाटील आदी उपस्थित होते.