जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने भाजपा प्रणित ईडीच्या माध्यमातून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांना नाहक त्रास दिला जात आहे. तसेच दिल्लीतील कार्यालयावर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने टॉवर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेधार्थ रॅली काढण्यात आली.
या रॅलीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार जिप गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे, जिल्हा सरचिटणीस जमीलभाई शेख, मुक्ती हारून नदवी, महानगरध्यक्ष शामभाऊ तायडे, बाबा देशमुख, मुजीब पटेल, मनोज सोनवणे, शेखर पाटील, डॉ. जगदीश पाटील, मुन्नवर खान, रविंद्र निकम, जलीलदादा पटेल, कदिर खान, योगेश महाजन, भुपेश जाधव, भरत कुवर, अनिल जंजाळे, सकलेन शेख, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई वाघ, मानसीताई पवार, प्रतिभाताई मोरे, चंद्रकलाताई इंगळे, डॉ. ऐश्वर्याताई राठोड, शबानाताई तडवी, यांच्यासह सर्वच फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष सहित काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.