उदयपूर (वृत्तसंस्था) रास्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसचे (Congress) तीन दिवसीय चिंतन शिबीर सुरु आहे. या शिबीरामध्ये देशातून काँग्रेसचे ४०० हून अधिक पदाधिकारी उपस्थित आहेत. या शिबीरात आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. यात त्यांनी देशव्यापी यात्रा करणार असल्याचे जाहीर केले.
सत्ता आल्यास EVM वर बंदी घालू असा मोठा निर्णय काँग्रेसनं घेतला. उदयपूरमधील काँग्रेसच्या नवसंकल्प शिबीरात काँग्रेसनं कात टाकण्याचे संकेत दिले आहेत. पक्षात यापुढे तिकीटवाटपात तरूणांना आणि महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. सर्वसामान्य जनतेशी काँग्रेसची नाळ जोडण्यासाठी ऑक्टोबरमध्ये देशव्यापी यात्रा काढण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून ही यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचा या यात्रेतून पक्षसंघटन मजबूत करण्याचं उद्देश असणार आहे.
काँग्रेसने या चिंतन शिबिरात तिकीटवाटपाबाबत निर्णय घेतला. यापुढे एका कुटंबातून एका व्यक्तिलाच उमेदवारी देण्यात येईल, असा हा निर्णय आहे. तसेच एकाच कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला पक्षात 5 वर्ष काम केल्यानंतरच उमेदवारी तसेच पक्षांतर्गत जबाबदारी देण्यात येईल.