नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार व त्यांचे बंधू आणि खासदार डी.के. सुरेश यांच्या १५ पेक्षा अधिक मालमत्तांवर सीबीआयने आज छापेमारी केली आहे. कथित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे.
माहितीनुसार, सीबीआय पोलीस अधीक्षक थॉमस जॉस यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी सकाळी सहा वाजता धाडी टाकत झाडाझडती सुरू केली. यानुसार सीबीआयच्या टीमने आज कर्नाटकमधील ९, दिल्लीतील ४, मुंबईतील एकासह १४ ठिकाणी छापा टाकत आहे. या दरम्यान ५० लाखांची रोकड मिळाली असून यासंबंधी चौकशी सुरु आहे. डी.के. शिवकुमार आणि त्यांच्या डीके सुरेश यांच्यावर उत्पानांपेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिवकुमार मागील दोन वर्षांपासून ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर आहेत. मागील वर्षी शिवकुमार यांना मनीलॉन्ड्रिंग प्रकरणी अटकही केली होती. सरकारने हे प्रकरण आता सीबीआयकडे सोपवले आहे. त्यानुसार आज सीबीआयने डी.के. शिवकुमार आणि त्यांच्या डीके सुरेश यांच्या मालमत्तांवर छापा टाकला आहे.
















